भजनी मालिका
← भजनांकडे परत

प्रपंच आमिष गुंतशील गळीं । शेवटीं तळमळी होइल रया

prapanch amish guntashil galin | shevatin talamali hoil raya

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
प्रपंच आमिष गुंतशील गळीं । शेवटीं तळमळी होइल रया ॥१॥ स्त्री पुत्र धन हें केवळ जाळें । गुंतशील बळे यांत रया ॥२॥ पुढील विचार धरी कांहीं सोय । संतसंग लाहें अरे मुढा ॥३॥ एका जनार्दनीं सत्संगावांचुनीं । कोण निर्वाणीं तारील तुज ॥४॥