भजनी मालिका
← भजनांकडे परत

प्रतिमेचा देव केला । काय जाणें ती अबला

pratimecha dev kela | kay janen ti abala

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
प्रतिमेचा देव केला । काय जाणें ती अबला ॥१॥ नवस करिती देवासी । म्हणती पुत्र देई वो मजसी ॥२॥ न कळेचि मुढा वर्म । कैसें जाहलेंसे कर्म ॥३॥ प्रतिमा केलीसे आपण । तेथें कैचे देवपण ॥४॥ देव खोटा नवस खोटा । एका जनार्दनीं रडती पोटा ॥५॥