भजनी मालिका
← भजनांकडे परत

प्रथम नमूं तो गुरुदेवो

pratham namun to gurudevo

प्रथम नमूं तो गुरुदेवो । जेथें निमाले भावाभावो । अनादि स्वरुप स्वयमेवो । तो आदि देवो नमियेला ॥१॥ जे हें मनाचें पैं मूळ । जेथे द्वैताचा दुष्काळ । स्वरुपीं स्वरुप केवळ । तो अढळ नमियेला ॥२॥ हें जग जेणेंसि संचलें । परी कोठें नाहीं नाडलें । जेविं हालिया अंतराळें । तैसा सर्व मेळे असतांही ॥३॥ ऐसा सर्वांअतीत । परी ऐसा हा जगभरी होत । कनक कांकणीं रहात । तैसा अविकृती निरंतर ॥४॥ जो मनबुध्दि अगोचर । तोचि झाला चराचर । हा आत्मसुखाचा विचार । आपविस्तार केला जेणें ॥५॥ तो जाणावा ज्ञप्तिरुप । निवृत्तिनाथाचें स्वरुप । एकदंत नामें ज्ञानदीप । बोध स्वरुप ज्ञान देवा ॥६॥