भजनी मालिका

भजने

तुटे मायाजाळ विघडे भवसिंधू । जरी लागे छंदू हरिनामाचा ॥१॥ येर कर्मधर्म करितां या कलीं । माजी कोण बळी तरला सांगा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

तुटोनि आकाश पडेलहि शिरीं । न सोडीं मी हरी पाय तुझे ॥१॥ तुझे पाय गोड तुझे पाय गोड । तुझे पाय गोड सर्व-काळ ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

तुतारे भोंवारें वाजंत्रें वाजती । अप्सरा नाचती थैयथैय ॥१॥ झणण झणण झांजा गर्जताती । नौबदा वाजती धोधोधोधो ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

तुमचिये दासींचा दास करूनि ठेवा । आशीर्वाद द्यावा हाचि मज ॥१॥ नवविधा काय बोलली जी भक्ती । घ्यावी माझ्या हातीं संतजनीं ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

तुमची ती भेटी नव्हे ऐसी जाली । कोरडी च बोली ब्रम्हज्ञान ॥१॥ आतां न बोलावें ऐसें वाटे देवा । संग न करावा कोणांसवें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

तुमचीं नामें गाऊं मुखें । तुम्हीं तीं सुखें ऐकावीं ॥१॥ नका यासी व्यवधान । मेळवा नयन नयनासी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

तुमचीया बळें तुम्हांसवें खेळावें । आपल्या नाडावें मतिवादें धांवता ॥१॥ याचिसाठीं क्षणक्षणां विनंति करीं । ठेवावें मजवरी अवलोकन कृपेचें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

तुमचें कृपेंचे पोसणें । त्याचें धांवणें करा तुम्हीं ॥१॥ गुंतलोंसे मायाजळीं । बुडतों जळीं भवाच्या ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

तुमचें तीर्थ आम्हीम आदरें सेवावें । तेणें तें पावावेम परब्रह्म ॥१॥ विश्वाकरवीं ब्रह्म ह्मणवितां तुह्मीं । म्हणों जी माय आम्ही पिता तुझी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव