भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुमचें जाहलिया दरुशन । जन्ममरण फिटला पांग

tumachen jahaliya darushan | janmamaran phitala pang

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
तुमचें जाहलिया दरुशन । जन्ममरण फिटला पांग ॥१॥ आतां धन्य जाहलों करुणाकरा । विश्वभंरा दयाळुवा ॥२॥ मागें कासविसक बहु जाहलों । दरुशनें पावलों सुखातें ॥३॥ एका जनार्दनीं कृपा केली । फळाची आली सर्वस्वे ॥४॥