भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुमचें कृपेंचे पोसणें । त्याचें धांवणें करा तुम्हीं

tumachen krupenche posanen | tyachen dhanvanen kara tumhin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
तुमचें कृपेंचे पोसणें । त्याचें धांवणें करा तुम्हीं ॥१॥ गुंतलोंसे मायाजळीं । बुडतों जळीं भवाच्या ॥२॥ कामक्रोध हे मगर । वे ढिताती निरंतर ॥३॥ आशा तृष्णा या सुसरी । वेढिताती या संसारीं ॥४॥ म्हणोनि येतों काकुळती । एका जनार्दनीं विनंती ॥५॥