भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुमचें चरित्र श्रवण । आवडी करुं तें कीर्तन

tumachen charitra shravan | avadi karun ten kirtan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
तुमचें चरित्र श्रवण । आवडी करुं तें कीर्तन ॥१॥ संसार पुसोनियां वाव । निजपद देशी ठाव ॥२॥ स्वभावें कीर्तन करितां । एवढा लाभ ये हातां ॥३॥ एका जनार्दनीं कीर्तनं । होती पातकी पावन ॥४॥