भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुटोनि आकाश पडेलहि शिरीं । न सोडीं मी हरी पाय तुझे

tutoni akash padelahi shirin | na sodin mi hari pay tujhe

रचनाकार: संत नामदेव · अभंग
तुटोनि आकाश पडेलहि शिरीं । न सोडीं मी हरी पाय तुझे ॥१॥ तुझे पाय गोड तुझे पाय गोड । तुझे पाय गोड सर्व-काळ ॥२॥ डोंगरासांगातें कोण करी वाद । वाउगी उपाद आहे आह्यां ॥३॥ नामा ह्मणे तुझें थोरपण काय । कायसे उपाय सांग आह्मां ॥४॥