भजनी मालिका

भजने

तुम्हांसी न कळे सांगा काय एक । कासया संकल्प वागवूं मी ॥१॥ आहे तेथें सत्ता ठेविलें स्थापूनि । प्रमाणें चि वाणी वदे आज्ञा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

तुम्हांसी शरण बहुत मागं आले । तयांचे साहिले अपराध ॥१॥ तैसा मी पामर यातिहीन देवा । माझा तो कुढावा करा तुम्ही ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

तुम्हांसी हें अवघें ठावें । किती द्यावें स्मरण ॥१॥ कां बा तुम्ही ऐसें नेणें । निष्ठुर पणें टाळितसां ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

तुम्हीं जावें निजमंदिरा । आम्ही जातों आपुल्या घरा ॥१॥ विठोबा लोभ असों देई । आम्ही असों तुमचें पाई ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम