भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुम्हीं उदार कृपाळ । मागें केलें प्रतिपाळ

tumhin udar krupal | magen kelen pratipal

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
तुम्हीं उदार कृपाळ । मागें केलें प्रतिपाळ ॥१॥ तैसे मज सांभाळावें । वदनीं वदवावें नाम तुमचें ॥२॥ आशापाश नका मोह । याचा निःसंदेह पाडावा ॥३॥ एका जनार्दनीं विज्ञापना । परिसा दीन दासाची ॥४॥