भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुम्हीं कृपांवतं देव । माझा हेवा चुकवावा

tumhin krupanvatan dev | majha heva chukavava

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
तुम्हीं कृपांवतं देव । माझा हेवा चुकवावा ॥१॥ सांपडलो काळाहातीं । उगवा गुंती तेवढी ॥२॥ माझें मन तुमचे चरणें । राहो चक्रपाणी सर्वदा ॥३॥ शरण एका जानर्दनीं । तुम्हीं धनी ब्रह्मांडीं ॥४॥