भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुम्हांसी शरण बहुत मागं आले । तयांचे साहिले अपराध

tumhansi sharan bahut magan ale | tayanche sahile aparadh

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
तुम्हांसी शरण बहुत मागं आले । तयांचे साहिले अपराध ॥१॥ तैसा मी पामर यातिहीन देवा । माझा तो कुढावा करा तुम्ही ॥२॥ नाहीं अधिकार उच्छिष्टा वेगळा । म्हणवोनी कळवळा पाळा माझा ॥३॥ चोखा म्हणे मज कांहीं तें न कळे । नामाचिया बळें काळ कंठी ॥४॥