भजनी मालिका
← भजनांकडे परत

अगाध हे कीर्ति विठ्ठला तुमची । महिमा आणिकांची काय सांगों

agadh he kirti viththala tumachi | mahima anikanchi kay sangon

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
अगाध हे कीर्ति विठ्ठला तुमची । महिमा आणिकांची काय सांगों ॥१॥ पुराणें भागलीं नेति नेति शब्द । श्रुतीचा अनुवाद खुंटलासे ॥२॥ शेषादिकां जेथें न कळेचि अंत । तेथें ती पतित काय वानूं ॥३॥ चोखा म्हणे माझा नाहीं अधिकार । कैसा हा विचार होईल नेणों ॥४॥