भजनी मालिका
← भजनांकडे परत

अखंड माझी सर्व जोडी । नामोच्चार घडोघडी । आतां न पडे सांकडीं पडो कबाडी वाया दु:खाचिया

akhand majhi sarva jodi | namochchar ghadoghadi | atan na pade sankadin pado kabadi vaya du:khachiya

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
अखंड माझी सर्व जोडी । नामोच्चार घडोघडी । आतां न पडे सांकडीं पडो कबाडी वाया दु:खाचिया ॥१॥ हाचि मानिला निर्धार । आतां न करी वाउगा विचार । वायां काय बा करकर । धरोनी धीर बैसलों ॥२॥ धरणें घेऊनि तुमचे द्वारीं । बैसेन उगाच मी गा हरी । कांही न करीं भरोवरी । नाम हरी गाईन ॥३॥ तुमची लाज तुम्हांसी । आपुलिया थोरपणासी । ब्रीद बांधिलें चरणासी । तें चोख्यासी दाखवीं ॥४॥