भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुटलें पडळ भेटलें केवळ

tutalen padal bhetalen keval

तुटलें पडळ भेटलें केवळ । सर्व हा गोपाळ गुरुमुखें ॥ १ ॥ न देखों बंधन सर्व जनार्दन । व्यासदिकीं खूण सांगितली ॥ २ ॥ ब्रह्मांडविवरण हरिचा हा खेळ । त्यांतील हा वेळ तोडियेला ॥ ३ ॥ निवृत्ति बोधला गुरुखुणा बोध । मनाचा उद्बोध हरिचरणीं ॥ ४ ॥