भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुमचिया नामस्मरणीं । निशिदिनीं मति लागो

tumachiya namasmaranin | nishidinin mati lago

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
तुमचिया नामस्मरणीं । निशिदिनीं मति लागो ॥१॥ आठव तो मज द्यावा । दुजा हेवा मी नेंणें ॥२॥ वारंवार नाम कीर्ति । आठवीन श्रीपती दयाळा ॥३॥ एका जनार्दनाचा आपुला । पाहिजे सांभाळिला मायबापा ॥४॥