भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुटला आयुष्याचा दोरा । येर वाउगा पसारा

tutala ayushyacha dora | yer vauga pasara

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
तुटला आयुष्याचा दोरा । येर वाउगा पसारा ॥१॥ ताकोनी पळती रांडा पोरें । अंती होती पाठमोरे ॥२॥ अवघे सुखाचे सांगती । कोणी कामा नये अंती ॥३॥ चोखा म्हणे फजितखोर । माझें माझें म्हणे घर ॥४॥