भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुमचा तो कळला भाव

tumacha to kalala bhav

तुमचा तो कळला भाव । माझा झाला पारखा ठाव ॥१॥ घेवोनी बैसलासी ठेवणें । माझे द्यावें मजकारणें ॥२॥ कायसा करिसी वादावाद । मुळींच खुण्टलासे भेद ॥३॥ कर्ममेळा म्हणे हरि । तुम्हां मज नाहीं उरी ॥४॥