भजनी मालिका
← भजनांकडे परत

आणिक वासना नाहीं दुजी मना

anik vasana nahin duji mana

आणिक वासना नाहीं दुजी मना । संतचरणीं जाणा मस्तक हें ॥१॥ घालीन लोटांगण वंदीन पायधुळी । पूर्व कर्मा होळी होय तेणें ॥२॥ नामाची आवडी सर्वकाळ वाचे । दुजें साधनचि नेणें कांही ॥३॥ कर्ममेळा म्हणे ही माझी वासना । पुरवा नारायणा सर्वभावें ॥४॥