भजनी मालिका
← भजनांकडे परत

आमुचा बाप तुझा पोसणा

amucha bap tujha posana

आमुचा बाप तुझा पोसणा । कां हो नारायणा विसरसी ॥१॥ धाकुटपणा मज म्हणियेंलें । आतां कां हो कठिण केलें ॥२॥ ब्रीद सांभाळी विठ्ठला । तरिच भलेपण तुला ॥३॥ म्हणे चोखियाचा कर्ममेळा । देवा न विसरावें मला ॥४॥