भजनी मालिका
← भजनांकडे परत

आतां येथवरी

atan yethavari

आतां येथवरी । मज नका बोलूं हरी ॥१॥ तुमचें आहे तुम्हा ठावें । माझें म्यांच करावें ॥२॥ आमुच्या संचिता । तुम्हां बोल काय आतां ॥३॥ माझें मन मज ग्वाही । वायां बोलिनियां काई ॥४॥ कर्ममेळा म्हणे जाणा । तुमचें माझें नारायणा ॥५॥