भजनी मालिका
संत तुकाराम

संत तुकाराम

सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.

संत तुकारामांचे हजारो अभंग तुकाराम गाथेत संग्रहित आहेत. "ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस" असे वारकरी संप्रदायात म्हटले जाते.

या संतांची भजने

शिखा सूत्र तुझा गुंतला जमान । तंववरी तूं जाण श्रुतिदास ॥१॥ त्याची तुज कांहीं चुकतां चि नीत । होसील पतित नरकवासी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

शिणलेती सेवकां देउनि इच्छादान । केला अभिमान अंगीकारा ॥१॥ अहो दीनानाथा आनंदमूर्ती । तुम्हांसि शोभती ब्रीदें ऐसीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

शिंदळा साल्याचा नाहीं हा विश्वास । बाईल तो त्यास न विसंभे ॥१॥ दुष्ट बुद्धि चोरी करी निरंतर । तो म्हणे इतर लोक तैसे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

शिळा स्फटिकाची न पालटे भेदें । दाउनियां छंदे जैसी तैसी ॥१॥ जैसा केला तैसा होय क्षणक्षणा । फेडावी वासना भक्तिभावें ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

शीतळ साउली आमुची माउली । विठाई वोळली प्रेमपान्हा ॥१॥ जाऊनि वोसंगा रिघे न वोरस । लागलें तें इच्छे पीइन वरी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

शुकसनकादिकीं उभारिला बाहो । परिक्षिती लाहो दिसां सातां ॥१॥ उठा उठी करी स्मरणाचा धांवा । धरवत देवा नाहीं धीर ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

शुद्ध चर्या हें चि संताचें पूजन । लागत चि धन नाहीं वित्त ॥१॥ सगुणाचे सोई सगुण विश्रांती । आपण चि येती चोजवीत ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

शुद्ध दळणाचें सुख सांगों । मानवत असे सईबाई ॥१॥ शुद्ध तें वळण लवकरी पावे । डोलवितां निवे अष्टांग तें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

शुद्धाशुद्ध निवडे कैसें । चर्म मास भिन्न नाहीं ॥१॥ कांहीं अधिक नाहीं उणें । कवण्या गुणें देवासी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

शुद्धीचें सारोनि भरियेली पाळी । भरडोनि वोंगळी नाम केलें ॥१॥ आडसोनि शुद्ध करीं वो साजणी । सद्धि कां पापिणी नासियेलें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम