भजनी मालिका
← भजनांकडे परत

शिळा जया देव । तैसा फळे त्याचा भाव

shila jaya dev | taisa phale tyacha bhav

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
शिळा जया देव । तैसा फळे त्याचा भाव ॥१॥ होय जतन तें गोड । अंतरा येती नाड ॥ध्रु.॥ देव जोडे भावें । इच्छेचें तें प्रेम घ्यावें ॥२॥ तुका म्हणे मोड दावी । तैशीं फळें आलीं व्हावीं ॥३॥