भजनी मालिका
← भजनांकडे परत

शिळें खातां आला वीट । सुनें धीट पाय धरी

shilen khatan ala vit | sunen dhit pay dhari

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
शिळें खातां आला वीट । सुनें धीट पाय धरी॥१॥ कान्होबा ते जाणे खूण । उन उन घास घाली ॥ध्रु.॥ आपुले ठायींचे घ्यावें । लाड भावें पाळावा ॥२॥ तुका म्हणे मी जुनाट सुने । मोहो आट परतला ॥३॥