भजनी मालिका
← भजनांकडे परत

शिकवूनि हित । सोयी लावावे हे नीत

shikavuni hit | soyi lavave he nit

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
शिकवूनि हित । सोयी लावावे हे नीत ॥१॥ त्याग करूं नये खरें । ऐसें विचारावें बरें ॥ध्रु.॥ तुमचिया तोंडें । धर्माधर्म चि खंडे ॥२॥ मजसाठी देवा । कां हो लपविला हेवा ॥३॥ जाला सावधान । त्यासी घालावें भोजन ॥४॥ तुका म्हणे पिता । वरी बाळाच्या तो हिता ॥५॥