भजनी मालिका
← भजनांकडे परत

शिंकें लावियेलें दुरी । होतों तिघांचे मी वरी

shinken laviyelen duri | hoton tighanche mi vari

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
शिंकें लावियेलें दुरी । होतों तिघांचे मी वरी ॥१॥ तुम्ही व्हारे दोहींकडे । मुख पसरूनि गडे ॥ध्रु.॥ वाहाती त्या धारा । घ्यारे दोहींच्या कोंपरा ॥२॥ तुका म्हणे हातीं टोका । अधिक उणें नेदी एका ॥३॥