भजनी मालिका
← भजनांकडे परत

शिष्यांची जो नेघे सेवा । मानी देवासारिखें

shishyanchi jo neghe seva | mani devasarikhen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
शिष्यांची जो नेघे सेवा । मानी देवासारिखें ॥१॥ त्याचा फळे उपदेश । आणिकां दोष उफराटे ॥ध्रु.॥ त्याचें खरें ब्रम्हज्ञान । उदासीन देहभावीं ॥२॥ तुका म्हणे सत्य सांगें । येवोत रागें येतील ते ॥३॥