भजनी मालिका
← भजनांकडे परत

शिणलेती सेवकां देउनि इच्छादान । केला अभिमान अंगीकारा

shinaleti sevakan deuni ichchhadan | kela abhiman angikara

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
शिणलेती सेवकां देउनि इच्छादान । केला अभिमान अंगीकारा ॥१॥ अहो दीनानाथा आनंदमूर्ती । तुम्हांसि शोभती ब्रीदें ऐसीं ॥ध्रु.॥ बहुतांनीं विनविलें बहुतां प्रकारीं । सकळां ठायीं हरी पुरलेती ॥२॥ तुका म्हणे अगा कुटुंबवत्सळा । कोण तुझी लीळा जाणे ऐसी ॥३॥