भजनी मालिका
संत निळोबा

संत निळोबा

या संतांची भजने

सेवेलागीं सेवक जालों । तुमच्या लागलों निज चरणा ॥१॥ अहो स्वामी तुकयादेवा । यावरी न करावा अव्हेर ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

सैंध दाटली अक्षरें । माप नव्हें पुरें । केली माझीया दातारें । अतिवृष्टी कृपेची ॥१॥ लिहितां न पुरे दिवसराती । वाढविला विस्तार तो मती । जैसे क्षीराब्धीवरीं येती । तरंग मिरविती असंख्य ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

सोडविलीं ऐसी बहुतें आयकें । भूतळीं पातकें तरलीं नामें ॥१॥ बोलियेले संत पुराणीं व्याख्यानें । तारिले चिंतनें महापापी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

सोडुनी तया न वचे दुरी । त्यांचा करी प्रतिपक्ष ॥१॥ म्हणे मी त्यांचा तेही माझे । नव्हती दुजे कल्पांतीं ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

सोंवळया नांव क्षीरसागर । वृथाचि मांजर गाजरीं ॥१॥ काय तैसी तें वायाणें । लटिकीं भूषणें मिरविती ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

स्थिरावल्या वृत्ती पांगुळला प्राण । अंतरिची खूण पावोनियां ॥१॥ पुंजाळले नेत्र जाले अर्धोन्मिलित । कंठ सद्रदित रोमांच आले ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

स्नेह सरतां जैसा दीन । सूक्ष्म होतचि हारप । तयापरी बाईंचे स्वरुप । तेणें शोषूनि घेतलें ॥१॥ नाहीं उरविलें शरीर । अवघेंचि केलें निराकार । ऐसें देखोनियां सत्वर । आम्हीही निघालों तेथुनी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

स्फूर्ति माझी चेतविली । गुणीं लाविली आपुलिये ॥१॥ आणखी दुजें नावडे कांहीं । येचि प्रवाहीं सुखावली ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

स्वप्नीं देखिलें तें जागृतीये नाहीं । हारपोनियां ठायी ठावोचि नुरे ॥१॥ तेचि परी झाली माझिया मानसा । संसारात माशा क्षंणेचि विरे ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

हरिभक्त माझे जिवलग सांगाती । सांभाळूनी नेती परलोका ॥१॥ वचनेंचि त्यांच्या होय महा लाभ । करी पदमनाभ कृपादृष्टी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

हरिभक्तीच्या जाणोनी नीति । त्याचि उपदेशिती भाविकां ॥१॥ पडो नेदिती अडचणी गोवा । जातां देवा भेटिसी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

हरिरुप ध्यानीं हरिनाम वदनीं । हरीच्या चिंतनीं तद्रूपता ॥१॥ हरि तयां अंतरी हरि तयां बाहेरी । रक्षी निरंतर श्रीहरी त्यां ॥२॥

रचनाकार: संत निळोबा