भजनी मालिका
संत निळोबा

संत निळोबा

या संतांची भजने

अखंड भूतदया मानसीं । वाचे नाम अहर्निशी । तया न बिसबे हषिकेशी । मागें मागें हिंडतसे ॥१॥ जिहीं परकारणीं वेंचिलें । शरीर आयुष्य आपुलें । धन वित्तही वंचिले । तयां विठठलें सन्मानिजे ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

अखंडता ते झाली ऐसी । विठ्ठल राहिला मानसीं । ध्यानीं मनीं लोचनासीं । अहर्निशीं निजबोध ॥१॥ जनीं वनीं जनार्दन । नाढळें त्या भिन्नाभिन्न । एकात्मता अनुसंधान । नित्य दर्शन विठठलीं ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

अगा ये नरकासुरमर्दना । कुशदैत्यनिकंदना । अगा कंसमधुकैटभसूदना । अगा मर्दना हिरण्याक्षा ॥१॥ अगा वृत्रासुरनिहंत्या । हिरण्यकश्यपा विदारित्या । अगा रावण संहारित्या । कुंभकरणादीराक्षसां ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

अगाध कीर्ति वाढले संत । केली विख्यात चरित्रें हीं ॥१॥ अग्नींत उभे विषचि प्याले । नाहीं ते भ्याले महा शस्त्रा ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

अगाध महिमा तुमचा देवा । काय म्यां वाणावा मूढमति ॥१॥ उगाचि म्हणवीं तुमचा दास । करुनियां आस पायांची ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

अंगी ऐश्वर्य येऊनि बाणें । तुमचे भक्तींचीं लक्षणें ॥१॥ तैं तो मान्य होय जगीं । विश्व वंदी तयालागीं ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

अग्निसंस्कार देउनी त्यासी । संपादिलें उत्तर विधीसी । मग निजगजरें उग्रसेनासी । स्थापिलें राज्य सिंहासनीं ॥१॥ नवाचि ध्वज नवें छत्र । व्दाहीं फिरविली सर्वत्र । साखरा वांटूनियां नगरांत । केले दानपात्र परमसुखी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

अग्नीची व्हावया शांती । उपाय आहे तुमच्याचि हातीं । लावोनियां बैसा पातीं । डोळेचि झांकुनी बळकट ॥१॥ उघडे ठेवितां चेतले वन्हीं । मग तो नाटोपे आम्हां लागुनी । सांडील अवघीयांसीच जाळुनी । झांका म्हणउनी निज नेत्र ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

अढळ वैराग्य प्रगटे अंगीं । बसतां संगीं संतांचिया ॥१॥ दिव्य भोगीं विटे मन । मृतिकेसमान सोनें रुपें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

अंतरीं नमप एकनाथ करी । धन्य धन्य वैखरी वदलिसे ॥१॥ लटिका व्यवहार सव्र हा संसार । मायेचा प्रसर मृगजळ ॥२॥

रचनाकार: संत निळोबा