भजनी मालिका
← भजनांकडे परत

अंतरींचे जाणा वर्म । कर्माकर्म फळदातें

antarinche jana varma | karmakarma phaladaten

रचनाकार: संत निळोबा · अभंग
अंतरींचे जाणा वर्म । कर्माकर्म फळदातें ॥१॥ तरि कां माझा अव्हेर केला । काय तो देखिला स्वभाव दुष्ट ॥२॥ नेणें करुं तुमची सेवा । परि मी देवा नाम जपें ॥३॥ निळा म्हणे यावरी आतां । येईल चित्ता तैसें करा ॥४॥