भजनी मालिका
संत निळोबा

संत निळोबा

या संतांची भजने

आठवितां नामें सुखची संतुष्टी । लाभें लाभ कोटी सुकृताचा ॥१॥ म्हणऊनि हाचि घेऊनियां छंद । गातुसे गोविंद विठ्ठल हरी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

आणिक तों युक्ति नाहीं माझया हातीं । आहें मूढमति म्हणूनियां ॥१॥ वारंवार तुम्हां करितों सूचना । नामें दयाघना उच्चारुनी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

आणिक हे ग्रंथ प्रमाण अष्टोतरशें । वदिलें स्वरसें गुरुकृपें ॥१॥ रामायण अदभुत सप्तकांड साचार । तंव प्रयाण विचार आरंभिला ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

आणिकही उदंड संतजन । राहिले व्यापून महीतळीं ॥१॥ नामेंचि पावन केलें दोषी । उध्दार आणिकांशीं करुनियां ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

आणिकातेंही विठ्ठल करिती । लागले संगती भाविक त्या ॥१॥ यांचा वारा लागेल ज्यासी । येती त्यासी मुक्तीही वरुं ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

आणिकांसी सांगे आशेचें बंधन । सदाचा बराडी असोनी आपण ॥१॥ काय म्हणावें यावरि आतां । नष्टाचा परम नष्ट हाचि हा पहातां ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

आणिखिही याचीं उदंड वर्मे । बोलतांचि ते नाशी आमुचीं कर्मे ॥१॥ म्हणोनियां याचें भयचि वाटे । बोलों जाय तंव बोलणेंचि कुंठे ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

आतां तरी बालका आणी । आपल्या करें मी लेववीन लेणीं । यशोदा म्हणे मांडिली हाणी । निवांत पोरटें नसेची ॥१॥ मग जाऊनियां पालखाजवळी । म्हणे मृत्यु पाचारिंतो तूंते वनमाळी । उगाचि असतासि जरि ये कळीं । तरि वांचतासी काय करुं ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

आतां तरी विचार करी । ध्यायीं अंतरीं विठठला ॥१॥ नाहीं तरी व्यर्थचि जासी । पुढें चौर्‍यांयसीं भोगावया ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

आतां निजप्रेमाची हे जाती । देहभावीं नुरे स्फूर्ति । अवघिया संसारे निवृत्ति । देवो चितीं सर्वदा ॥१॥ ओकिलें अन्न जैसें राहे । कोणी फिरोनियां न पाहे । विषय देखोनि तैसें होये । महा वैराग्य त्या नांवे ॥२॥

रचनाकार: संत निळोबा