भजनी मालिका
← भजनांकडे परत

आतां अवघे हरिचे जन । करा हो चिंतन नामाचें

atan avaghe hariche jan | kara ho chintan namachen

रचनाकार: संत निळोबा · अभंग
आतां अवघे हरिचे जन । करा हो चिंतन नामाचें ॥१॥ देव नुपेक्षील सर्वथा । करा कथा कीर्तनें ॥२॥ टाळ मृदंग लावा भेरी । नाचा गजरी हरिनामें ॥३॥ निळा म्हणे वैकुंठवासी । येती भेटीसी तुमचीये ॥४॥