भजनी मालिका
← भजनांकडे परत

आणिक हे ग्रंथ प्रमाण अष्टोतरशें । वदिलें स्वरसें गुरुकृपें

anik he granth praman ashtotarashen | vadilen svarasen gurukrupen

रचनाकार: संत निळोबा · अभंग
आणिक हे ग्रंथ प्रमाण अष्टोतरशें । वदिलें स्वरसें गुरुकृपें ॥१॥ रामायण अदभुत सप्तकांड साचार । तंव प्रयाण विचार आरंभिला ॥२॥ समाधि सुखाचा सोहळा अपार । होता जयजयकार प्रतिष्ठानीं ॥३॥ निळा म्हणे ऐसा ब्रम्हानंद झाला । आंनदी लोटला आनंदचि ॥४॥