भजनी मालिका
← भजनांकडे परत

आणिखिही याचीं उदंड वर्मे । बोलतांचि ते नाशी आमुचीं कर्मे

anikhihi yachin udand varme | bolatanchi te nashi amuchin karme

रचनाकार: संत निळोबा · अभंग
आणिखिही याचीं उदंड वर्मे । बोलतांचि ते नाशी आमुचीं कर्मे ॥१॥ म्हणोनियां याचें भयचि वाटे । बोलों जाय तंव बोलणेंचि कुंठे ॥२॥ वेदहि ना बोलेचि भेउनी याला । देखोनि यातें मग मौन्येचि ठेला ॥३॥ काळहि कांपे याचिया धाकें । त्यासिहि गिळूनि आपणचि ठाके ॥४॥ ना बोलती योगी याचिया भेणें । ध्यानीचि बैसले वसवूनि रानें ॥५॥ संतहि याची न करित गोठी । धरुनि राहिले उगलेचि पोटीं ॥६॥ अणुमात्र याची बोलतांचि कर्मे । मरणासीचि मारुनी हरितो जन्में ॥७॥ धीटपणें निळा बोलिला कांहीं । बोलतांचि लाविला आपुला वाही ॥८॥