भजनी मालिका
संत निळोबा

संत निळोबा

या संतांची भजने

आनंदे वैष्णव गाती पै नाचती । जयजयकार करिती ऋषीमुनी ॥१॥ विमानांची दाटी पुष्पांचा वरुषाव । स्वर्गीहूनि देव करिताती ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

आपणा समान केलें त्यासी । धरिलें ज्यासी निजहातीं ॥१॥ ऐसा देवो कृपासिंधु । म्हणोनि बंधु दीनांचा ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

आपलीं धणी पुरेंतों घ्यावें । उरले ठेवावें तैसेचि ॥१॥ भरला आहे हा सागर । नलगे अंतपार कोणासी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

आपुलें तुम्हीं न संडावें । कर्म स्वाभावें आहे तें ॥१॥ सांभाळावें नामधरका । निरसुनी पातका भेटी दयावी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

आमुचा जिवलग सांगती । जन्मोजन्मींचा श्रीपती । एकीसवें एकी बोलती । आणि आळंगिती हदयेसीं ॥१॥ नाना परीच्या विनोदवार्ता । सांगाती बोलती अनंता । तुझेनि भाग्यें भाग्यवंता । म्हणती आम्ही संसारी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

आम्हा ताराल जरि श्रीहरि । कीर्ति तुमची वाढेल तरी ॥१॥ पुढेंहि चोखाळती वाटा । भाव भक्तिचा चोखटा ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

आम्हां सुखा नाहींचि उणें । सेवागुणें स्वामीचियां ॥१॥ अवघ्या ब्रम्हांडाच्या सूत्रीं । गाऊं वक्‍त्रीं गुण त्याचे ॥२॥

रचनाकार: संत निळोबा