भजनी मालिका
← भजनांकडे परत

आधीं भक्त पाठी देव । प्रगटे भाव देखोनी

adhin bhakta pathi dev | pragate bhav dekhoni

रचनाकार: संत निळोबा · अभंग
आधीं भक्त पाठी देव । प्रगटे भाव देखोनी ॥१॥ काचोळी पाठी कण । भूस निकण मग दाणा ॥२॥ आधीं तंतु पाठी वस्त्र । कनका अलंकार रुप करी ॥३॥ निळा म्हणे भक्ताविण । कैंचे देवपण देवासी ॥४॥