भजनी मालिका
संत निळोबा

संत निळोबा

या संतांची भजने

हेंचि आम्हांसी गुरुगम्य । हरीचें नाम उपदेशिलें ॥१॥ आणिकां साधनीं चाड नाहीं । घालिती अपायीं म्हणोनियां ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

हेंचि त्यांचे नित्य काम । दावणें धर्म विहिताचे ॥१॥ ज्याचें तया स्वहित जोडें । ऐसें उघडें बोलती ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

होऊनियां तेचि राहिले निवांत । रुपीं अखंडित होउनी संत ॥१॥ नित्य निरामय अखंड अव्दय । ध्याती देवत्रय ज्यातें सदा ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

होतें तैसें पांई केलें निवेदन । अंतरलों दीन बहुत होतों ॥१॥ संबोखून केले समाधान चित्ता । वोगरुनि भाता प्रेमरस ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

होतें बहुत दिवस आर्त वागविलें । आजी अकत्मात तें फळ देऊं आलें । दृष्टी श्रीहरीची देखिलीं पाऊलें । घेतलें जन्म मागें सार्थक त्यांचे झालें वो ॥१॥ धन्य हे आनंदाची सापडली वेळ । तेणें संत सज्जन भेटले कृपाळ । त्यांनींचि फेडियेला बुध्दीचा वो मळ । दृष्टी दाखविला यशोदेचा बाळ वो ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

होतें लेउनियां आतींचे अंजन । तेणें देखिलें वो निक्षेपीचें धन । होतें वेदरायें ठेविलें जोडून । तेंचि सांपडलें आईतें निधान वों ॥१॥ जनीं जनार्दन प्रत्यक्षचि होता । तोचि मुसावोनि कृष्ण झाला आतां । मंडित चतुर्भज वेणुवाजविता । मुकुट कुंडले वो माळाचा मिरवता वो ॥२॥

रचनाकार: संत निळोबा