भजनी मालिका
← भजनांकडे परत

होतें तैसें पांई केलें निवेदन । अंतरलों दीन बहुत होतों

hoten taisen pani kelen nivedan | antaralon din bahut hoton

रचनाकार: संत निळोबा · अभंग
होतें तैसें पांई केलें निवेदन । अंतरलों दीन बहुत होतों ॥१॥ संबोखून केले समाधान चित्ता । वोगरुनि भाता प्रेमरस ॥२॥ नामरत्नमणी करुनि भूषण । अळंकारीं मंडण माळा दिली ॥३॥ निळा तेणें सुखें झाला निरामय । नामीं नाम सोये निमग्नता ॥४॥