भजनी मालिका
← भजनांकडे परत

होईल अंगी बळ । तरी फजीत करावे ते खळ

hoil angi bal | tari phajit karave te khal

रचनाकार: संत निळोबा · अभंग
होईल अंगी बळ । तरी फजीत करावे ते खळ ॥१॥ जे कां करुनियां पाखांड । लटिकेंचि वाढविती बंड ॥२॥ भोंदिती भाविकां । कथुनी परमार्थ तो लटिका ॥३॥ निळा म्हणे तोंडें सांगें । तैसें नाचरोनियां अंगें ॥४॥