भजनी मालिका
संत निळोबा

संत निळोबा

या संतांची भजने

सकळांचिया नेत्रें तुम्हां सर्वही देखणें । सकळांचिया श्रोत्रें तुम्हां सर्वही ऐकणें ॥१॥ ऐसे सर्वज्ञची तुम्हीं सर्वदा देवा । जेथिल तेथें ज्याच्या तैशा जाण तसा भावा ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

सगुण निर्गुण कल्पनेचा भास । वस्तु अविनाश व्यापकत्वें ॥१॥ स्वानुभवें पाहीं लटिकें साच नाहीं । परिपूर्ण अवघाही आत्माराम ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

संचित प्रारब्ध क्रियमाण । न सुटे प्रणियां भोगिल्याविण । यालागीं करावें हरीचें स्मरण । तुटेल बंधन मग त्यांचे ॥१॥ सतकर्म करितां विधियुक्त । माजी निषेधाचा पडे आघात । सांग अथवा व्यंग होत । होय तें संचित निश्चयेंसी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

संत एकांतीं बैसजे । सर्वही सिध्दांत शोधिले । ज्ञानदृष्टी अवलोकिलें । सारांश काढिलें निवडुनी ॥१॥ तें एक श्रीहरींचे नाम । सकळ पातकां करी भस्म । अधिकारी उत्तम आणि अधम । चारी वर्ण नरनारी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

संत गाती सनकादिक । तुमचिये कौतुक कीर्तिचें ॥१॥ तारिल्या शिळा गिळीला वन्ही । पर्वत उचलूनि धरिला वरी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

संतकृपा त्यांसीचि फळे । ज्यांचें चित्त वोळे परमार्थी ॥१॥ काय उणें सुखा मग । संतसंग जोडता ॥२॥

रचनाकार: संत निळोबा