भजनी मालिका
← भजनांकडे परत

संतभेटीचें आरत । उभाचि राहिला तिष्ठत

santabhetichen arat | ubhachi rahila tishthat

रचनाकार: संत निळोबा · अभंग
संतभेटीचें आरत । उभाचि राहिला तिष्ठत ॥१॥ बापकृपाळु श्रीहरी । वाट पाहे निरंतरीं ॥२॥ धांव घालूनियां पुढें । आलिंगी त्या वाडेंकोडें ॥३॥ निळा म्हणे नवाची नित्य । सोहळा भक्तांचा करित ॥४॥