भजनी मालिका
संत निळोबा

संत निळोबा

या संतांची भजने

वेडा नव्हे मुका चतुर शहाणा । बोले अबोलणा मौनावस्था ॥१॥ विष्णुदासा निळा वाचा विदेहता । अंगी सप्रेमता आवडीची ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

वेणु वाजवीत यमुनेच्या तटीं । उभा कान्हया सांवळा जगजेठी । भोंवती गोधनें वो थाटीं । एकोनि गवळणी धांवती उठाउठीं वो ॥१॥ ऐसा जनमन मोहनरंजवणा । गुणीं गुणातीत नंदाचा पोसणा । करुनि अकर्ता हा सृष्टयादिरचना । विश्वीं विश्वातीत अलक्ष देखणा वो ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

वैराग्याचा मेरु तो गोरा कुंभार । तोडियले कर आणेसाठीं ॥१॥ महाव्दारीं कथा श्रवण करितां । टाळी वाजवितां निघती नवे ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

वोरसोनियां भक्तासाठीं । धांवे वैकुंठीहुनी उठाउठी । हात ठेऊनियां कटीं । उभा व्दारीं ठाकला ॥१॥ देखोनियां पुंडलिकासी । वास केला तयापाशीं । अवलोकूनियां निजभक्तांसी । परम विश्रांती पावला ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

व्दारकेचि मूर्ती एकनाथा घरी । पाणी वाहे हरि कावडीने ॥१॥ श्रीखंडया चंदन उगाळूनि करी । वस्त्र गंगातीरी धूत असे ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

शहाणे तेचि परस्त्रीपाशीं । क्षणहि सहवासीं न बैसती ॥१॥ येती जाती तरी ते दुरी । चौघाभीतरी त्याचिसवें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा