भजनी मालिका
← भजनांकडे परत

संत एकांतीं बैसजे । सर्वही सिध्दांत शोधिले । ज्ञानदृष्टी अवलोकिलें । सारांश काढिलें निवडुनी

sant ekantin baisaje | sarvahi sidhdant shodhile | dnyanadrushti avalokilen | saransh kadhilen nivaduni

रचनाकार: संत निळोबा · अभंग
संत एकांतीं बैसजे । सर्वही सिध्दांत शोधिले । ज्ञानदृष्टी अवलोकिलें । सारांश काढिलें निवडुनी ॥१॥ तें एक श्रीहरींचे नाम । सकळ पातकां करी भस्म । अधिकारी उत्तम आणि अधम । चारी वर्ण नरनारी ॥२॥ विठ्ठल नामें उच्चार ओंठी । विठ्ठल मूर्ती पाहतां दृष्टी । लाभे ब्रम्हतेची पुष्टी । वाढे पोटीं निज शांती ॥३॥ देखतां कापती त्या काळ । हरिच्या ऐसे अंगी बळ । प्रगटे वैराग्य अढळ । तुटती मळ ममतेचे ॥४॥ महा दोषांची झाडणी । अहंभावादिकांची गाळणी । उभय कुळें बैसवोनि । जाती विमानीं वैकुंठा ॥५॥ ऐसा नामाचा प्रताप । उरों नेदीं पुण्य पाप । भंगूनियां त्रिविधताप । ठाकती सद्रूप होऊनि ॥६॥ दृष्य नुरें त्यांचिये दृष्टी । ब्रम्हानंदें कोंदे । निळा म्हणे धरितां कंठीं । बीजमात्र हरिनाम ॥७॥