भजनी मालिका
← भजनांकडे परत

हो तुम्ही कृपावंता । किती आतां विनवावें

ho tumhi krupavanta | kiti atan vinavaven

रचनाकार: संत निळोबा · अभंग
हो तुम्ही कृपावंता । किती आतां विनवावें ॥१॥ न दयाचि कांही प्रत्युतर । ऐसे निष्ठुर केवि तरी ॥२॥ नेणों दासाचा त्रास आला । दिसे मांडिला अव्हेर ॥३॥ काय करुणाचि हारविली । विपरीत झाली दशा दिसे ॥४॥ निळा म्हणे म्हातारपण । आलें दारुण नुठवेसें ॥५॥