भजनी मालिका
← भजनांकडे परत

आप आपणा नेणता । निर्मी बहमांडाच्या चळथा

ap apana nenata | nirmi bahamandachya chalatha

रचनाकार: संत निळोबा · अभंग
आप आपणा नेणता । निर्मी बहमांडाच्या चळथा ॥१॥ काय सांगो नवल परी । ऐसी याची आकळ चोरी ॥२॥ अंगें आपण निराकार । प्रकटोनि दावी जगदाकार ॥३॥ निळा म्हणे महर्षि देवा । न कळती ऐशा याच्या मावा ॥४॥