भजनी मालिका
← भजनांकडे परत

आमुचा जिवलग सांगती । जन्मोजन्मींचा श्रीपती । एकीसवें एकी बोलती । आणि आळंगिती हदयेसीं

amucha jivalag sangati | janmojanmincha shripati | ekisaven eki bolati | ani alangiti hadayesin

रचनाकार: संत निळोबा · अभंग
आमुचा जिवलग सांगती । जन्मोजन्मींचा श्रीपती । एकीसवें एकी बोलती । आणि आळंगिती हदयेसीं ॥१॥ नाना परीच्या विनोदवार्ता । सांगाती बोलती अनंता । तुझेनि भाग्यें भाग्यवंता । म्हणती आम्ही संसारी ॥२॥ कृष्णा आत्मया सुखानंदा । परात्परा जी आनंदकंदा । नित्या अचिंत्या अभेधा । देवत्रयां तूं वंदय ॥३॥ ऐसा असोनियां आम्हां आरजा । खेळणें झालासी आजिच्या काजा । धन्य आम्हीही गरुडध्वजा । तुझे पादपध देखतों ॥४॥ आणखीही एक नवल थोर । परमात्मया तूं परात्पर । आम्हालागीं रुप साकार । आवडी ऐसेंचि धरियेलें ॥५॥ कृष्णा म्हणोनियां पाचारितां । वो म्हणोनियां येसी धावंतां । येरवी वेदाचियांही संमता । उरविसी रुप निर्धारिं ॥६॥ निळा म्हणे ऐशिया प्रेमें । अनुसरल्या त्या भक्तिसंभ्रमे । तैसेंचि जाणोनियां त्या परब्रहमें । पुरविले त्यांचे सोहळे ॥७॥