भजनी मालिका
← भजनांकडे परत

आपणा नोळखें । झाले ठायींचि पारिखे

apana nolakhen | jhale thayinchi parikhe

रचनाकार: संत निळोबा · अभंग
आपणा नोळखें । झाले ठायींचि पारिखे ॥१॥ विस्मय हा वाटे मना । कैसी भ्रमाची भावना ॥२॥ निजविसराचिया हातें । हारविलें हो आपणीयातें ॥३॥ निळा म्हणें घरिंच्या घरीं । आपआपणीयासीचि चोरी ॥४॥