भजनी मालिका
← भजनांकडे परत

आतां तरी बालका आणी । आपल्या करें मी लेववीन लेणीं । यशोदा म्हणे मांडिली हाणी । निवांत पोरटें नसेची

atan tari balaka ani | apalya karen mi levavin lenin | yashoda mhane mandili hani | nivant poraten nasechi

रचनाकार: संत निळोबा · अभंग
आतां तरी बालका आणी । आपल्या करें मी लेववीन लेणीं । यशोदा म्हणे मांडिली हाणी । निवांत पोरटें नसेची ॥१॥ मग जाऊनियां पालखाजवळी । म्हणे मृत्यु पाचारिंतो तूंते वनमाळी । उगाचि असतासि जरि ये कळीं । तरि वांचतासी काय करुं ॥२॥ ऐसें बोलोनियां आणिला । पूतने वोसंगा बैसविला । देखतांचि पूतने वोसंडला । उभंड प्रेमाचा न सावरे ॥३॥ सुंदरपणाचि झाली सीमा । उपदेशी मदना अंगी काळीमा । अवलोकूनियां पुरुषोत्तमा । तनुमनप्राणें निवालीं ॥४॥ म्हणे गे यशोदे साजणी । परम सुखाची हे लाधलीसी धणी । जतन करी पुत्रमणी । दुर्लभ भाग्येंचि पावलिसी ॥५॥ पूतना राक्षसी अति क्रूर । तेही देखोनियां कृष्णचंद्र । नयनी अश्रु आणूनियां वारंवार । श्रीमुखकमळ अवलोकी ॥६॥ निळा म्हणे अगाध बुध्दी । होउनी परतली प्रालब्द सिध्दी । म्हणे कार्य साधूनियां त्रिशुदी । जावें सत्वर राजभुवना ॥७॥