भजनी मालिका
← भजनांकडे परत

स्फूर्ति माझी चेतविली । गुणीं लाविली आपुलिये

sphurti majhi chetavili | gunin lavili apuliye

रचनाकार: संत निळोबा · अभंग
स्फूर्ति माझी चेतविली । गुणीं लाविली आपुलिये ॥१॥ आणखी दुजें नावडे कांहीं । येचि प्रवाहीं सुखावली ॥२॥ नानापरींचे अर्थभेद । वाचे विद्रद उमटती ॥३॥ निळा म्हणे मांडितों वोळी । वदवा मुखकमळीं तुम्ही ते ॥४॥